कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याने उदगीरमध्ये कडकडीत बंद

1087

लातूर जिल्ह्यामध्ये कोरनाग्रस्त एकही रुग्ण नसल्याने लातूर जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, उदगीरमध्ये शनिवारी एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. उदगीर व परिसरामध्ये व तालुक्यामध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रत्येक गावामध्ये कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. उदगीर शहराच्या मुख्य ठिकाणापासून तीन किलोमीटर अंतरावर कर्फ्यू जाहीर करण्यात आला असून शहरांमध्ये 100% बंद पाळण्यात येत आहे. जागोजागी बंदोबस्त आहे. लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. शहरातील चौबारा परिसर सील करण्यात आला आहे. मृत महिलेच्या घरातील किती लोकांना क्वॉरंटाईनमध्ये ठेवले याची माहिती प्रशासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या