आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचा पहिला बळी, जमातहून परतेल्या मुलाकडून पित्याला झाली होती लागण

883
file photo

आंध्र प्रदेशमध्ये कोरोनामुळे 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशमधील कोरोनामुळे झालेले पहिला मृत्यू आहे. राज्य सरकारने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आंध्र प्रदेशमध्ये आतापर्यंत 161 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

मृत व्यक्तीचा मुलगा 17 मार्च रोजी नवी दिल्लीच्या तबलिगी जमात कार्यक्रमात सामील झाला होता. या कार्यक्रमातून परतल्यानंतर मुलाकडून पित्याला कोरोनाची लागण झाली. 30 मार्च रोजी सदर व्यक्ती सरकारी इस्पितळात चाचणी करण्यासाठी आले होते. रात्री त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. नंतर 12.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

सदर व्यक्तीला उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृद संबधित आजार होते. त्यांना इतरही आजार असल्याने कोरोनाची लागण झाली आहे हे कळण्यास उशीर झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली. मुलालाही कोरोनाची लागण  झाली होती. डॉक्टरांनी त्याला विलगीकरण कक्षात ठेवले होते.

डॉक्टरांनी 29 जणांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे.सर्वजण मृत व्यक्ती आणि मुलाच्या संपर्कात आले होते. आंध्र प्रदेशमध्ये ज्या 161 जणांना लागण झाली आहे त्यापैकी 140 जणांना तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सामील झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या