पालघरमध्ये कोरोनाचा पहिला बळी, रिपोर्ट येण्यापूर्वीच रुग्णालयात मृत्यू

1116
file photo

पालघरमध्ये  कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असून धक्कादायक म्हणजे त्याचा रिपोर्ट आज मुंबईहून येण्या आधीच त्याने ग्रामीण रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.  पालघरमध्ये  कोरोनाचा पहिला बळी गेल्याने प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून या व्यक्तीवर ग्रामीण रुग्णालयात विलगिकरण कक्षात उपचार सुरू होते .त्याच्या घशाच्या स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर ती व्यक्ती कोरोनाबधित असल्याचे आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. कालपासून त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. त्यातच मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.  या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या त्याच्या नातेवाईकांचे चाचणीसाठी नमुने घेतले असून  तपासणीसाठी पालिकेत आतापर्यंत 7 रुग्ण आढळले आहेत.  तर पालघर तालुक्यात हा पहिलाच रुग्ण आढळला असून तोच पहिला बळी ठरला आहे.  या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याने संपर्क केलेली ठिकाणे सीलबंद करण्यात आली असून प्रत्ययेक  ठिकाणी प्रशानसनामार्फत युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या