रेल्वे रुळावर सेल्फी घेत होत्या तरुणी, ट्रेनच्या धडकेत एकीचा मृत्यू

1069
file photo

रेल्वे रुळावर सेल्फी घेणे एका तरुणीच्या जिवावर बेतले आहे. सेल्फी घेताना ट्रेनच्या धडकेत 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. तसेच या तरुणीची मैत्रीण या अपघातात जखमी झाली असून तिची प्रकृती गंभीर आहे.

हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये काही विद्यार्थ्यांची सहल ओडलाबारी या नदी किनारी गेली होती. या नदीवर एक रेल्वेचा ब्रिज आहे. दोन तरुणी या ब्रिजवर सेल्फी काढण्यासाठी गेल्या. तेव्हा मागून पॅसेंजर ट्रेनने दोघींना जोरदार धडक दिली. त्यात एक तरुणी खाली नदीत पडली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. दुसरी तरुणी खाली पडली. ती तरुणीही या अपघातात गंभीर जखमी झाली असून तिला जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तिच्या उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या