एक लाख रोहिंग्यांचे बांगलादेशात पुनर्वसन

557

आपल्या देशात बेकायदेशीर घुसखोरी करणाऱया रोहिंग्यांना हुसकविण्याचा हिंदुस्थानकडून प्रयत्न सुरू झालेला असतानाच आता बांगलादेशने तब्बल 1 लाख रोहिंग्यांचे त्यांच्या देशात पुनर्वसन करण्यासाठी पावसाळ्यात पाणी साठणाऱ्या एका बेटावर व्यवस्था केली आहे.

मात्र सध्या कॉक्स बाजार येथे वसलेल्या या रोहिंग्यांना कधी त्या बेटावर हलविणार हे मात्र बांगलादेश सरकारने स्पष्ट केलेले नाही. ‘भासन चार’ असे नाव असलेल्या या बेटावर बांगलादेशने सुरक्षिततेसाठी तटबंदी केली असून तेथे घरे, रुग्णालये आणि मशिदींचीही उभारणी केली आहे. हे बेट बंगालच्या खाडीमध्ये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या