जळगावात आणखी एक रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह

1359

जळगाव जिल्ह्यातील अजून एका रूग्णाचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील रूग्णांची संख्या दोन झाली आहे. ही माहिती जिल्हा प्रशासनाने 1 एप्रिल रोजी रात्री दिली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. याचाच भाग म्हणून देशात 21 दिवसांचा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. असे असूनही जळगाव जिल्ह्यातील नागरिक लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. देशातील परिस्थिती लक्षात घेता पुढील काळात नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले नाही तर कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. ही बाब नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे, येणारे दोन आठवडे अधिक काळजीचे असल्याने जळगाव जिल्हावासियांनी घराबाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जावू नये. जीवनावश्यक वस्तूचा कुठलाही तुटवडा भासणार नाही. त्यामुळे त्या घेण्यासाठी गर्दी करू नये. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लाॅकडाऊनची साखळी अधिक भक्कम करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या