नळगंगा धरणातून सोडलेल्या पाण्यात रिक्षासह चालक गेला वाहून

नळगंगा धरणातून पाणी सोडल्याने आलेल्या पुरात पुलावरून रिक्षा नदीपात्रात कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तब्बल 16 वर्षानंतर नळगंगा धरण 100 टक्के भरल्याने पाणी सोडले.

नळगंगा धरणातून नळगंगा नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याने मलकापूर शहरातील नळगंगा नदीपात्रावरील तब्बल 6 ते 7 पुल पाण्याखाली गेल्याने शहराशी पारपेठ, सालीपुरासह अनेक परिसराचा संपर्क तुटला होता. तर या पाण्याच्या प्रवाहाखाली सातही छोटे पुल बुडाले असून या पुलाला कठडे नसल्याने पारपेठ परिसरातील रहिवासी मो.रफिक मो.अफरोज हा रिक्षा घेऊन जात होता. तेव्हा पाणाच्या जोरदार प्रवाहात रफिक रिक्षासह नदीपात्रात पडले. उपस्थित नागरिकांनी त्यास वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. तब्बल 16 वर्षानंतर नळगंगा धरण 100 टक्के भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. या पाण्याने नदीपात्रावर असलेल्या पुलांवरुन पाणी असल्याने मलकापूर शहराचा नळगंगा नदीपात्रापलीकडील पारपेठ, सालीपुरा, काशीपुरा, राजपुरा, मोहनपुरा परिसराचा संपर्क तुटला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या