जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद

440

जम्मू कश्मीरमधील उरी सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. पाकिस्तानकडून गेल्या दोन दिवसांपासून सतत सीमा रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. हिंदुस्थानी लष्कराने देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

मंगळवारी पाकिस्तानने पूँछ व राजौरी जिल्ह्यातील मेंढर, क्रृष्णा घाटी, नौशेरा, पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. रात्री दहाच्या सुमारास पाकिस्तानने गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. हा गोळीबार पहाटेपर्यंत सुरू होता, असे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या