कोल्हापूरात 24 तासात 1 हजार 14 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांवर

538
corona-virus-new-lates

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शुक्रवारी सायंकाळी 5 ते शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासात 1 हजार 14 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 10 हजाराच्या घरात पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 9 हजार 991 झाली आहे.

कोरोनामुक्त झालेल्या 179 जणांना शनिवारी घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 4 हजार 121 कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 12 जणांचा तर आतापर्यंत 261 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण 5 हजार 608 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 1 हजार 14 पॉझिटिव्ह अहवालांमध्ये कोल्हापूर शहरातील 312, इंचलकरंजीसह इतर नगरपरिषद क्षेत्रातील 230, हातकणंगलेतील 153, करवीरमधील 100,शिरोळमधील 50, कागलमधील 41,पन्हाळामधील 35, गडहिंग्लजमधील 21,आजरामधील 11 तर राधानगरी आणि शाहुवाडी तालुक्यात प्रत्येकी 12 येथील रुग्णांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या