
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील सामान्य रुग्णालयात एका 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 34 वर पोहचली आहे. उदगीर तालुक्यातील मौजे गुडसूर येथील 60 वर्षीय महिलेला कोरोनाच्या उपचारासाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील हा 34 वा मृत्यू ठरला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या