एक किलो कांद्याच्या दरात एक किलो चिकन, एक बिअर

367
onion-market

किचनपासून हॉटेलपर्यंत मुक्तपणे वावरणार्‍या कांद्याचे दर्शन सध्या दुर्मिळ झाले आहे. 10-20 रुपये किलोच्या या कांद्याने चक्क 200 रुपयांचा भाव खात चिकन, पेट्रोल, बिअर आणि पिठाच्या पंक्तीत मानाचे स्थान पटकावले आहे. त्यामुळे कांद्याचे नुसते नाव जरी काढले तरी गृहिणींबरोबरच हॉटेलवाल्यांच्याही डोळ्यांत पाणी येत आहे.

अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे देशातील कांद्याचे पुरते वांदे झाले आहेत. त्याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या किचनपासून हॉटेलवाल्यांना बसला आहे. सोलापूरच्या कांदा बाजारात एक किलो कांद्याचा दर 200 रुपये आहे. कांद्याच्या या वाढलेल्या किमती पाहता तेवढय़ाच पैशात बाजारात चक्क एक किलो चिकन, पाच किलो पीठ, अडीच लिटर पेट्रोल किंवा चांगल्या दर्जाची बियर सहज मिळत आहे. त्यामुळे आणखी किती दिवस हा कांदा वांदे करणार असा संताप व्यक्त होत आहे. तर आणखी महिनाभर कांद्याचे हेच दर कायम राहणार असल्याचे मत व्यापार्‍यांकडून व्यक्त केले जात आहे. दरम्यान, कांद्याचे दर का वाढले याचा शोध आता बनारस हिंदू विद्यापीठाचा आयआयटी विभाग घेणार आहे.  

शहर         25 नोव्हेंबर  30 नोव्हेंबर  8 डिसेंबर

नवी दिल्ली   76 रुपये          76 रुपये          94 रुपये

मुंबई            89 रुपये          90 रुपये          120 रुपये

चेन्नई            59 रुपये          80 रुपये          120 रुपये

कोलकाता     90 रुपये          95 रुपये          120 रुपये

पणजी          100 रुपये        110 रुपये        165 रुपये

आज कांद्याचे भाव वाढत असून लोक मोदी यांना म्हणतात, कांद्याचे भाव कमी करा. मोदी हे काय कांदे उगवणार आहेत का? काही लोक मोदी यांना उगाच कोसत आहेत. – योगगुरू बाबा रामदेव

आपली प्रतिक्रिया द्या