दिल्ली, मुंबई, अहमदाबादमध्ये 24 रुपये किलोने मिळणार कांदा

मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. परिणामी, कांद्याचे दर वाढत चालले असून बाजारातून कांदा गायबही होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार खडबडून जागे झाले असून दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादमध्ये कांदा 24 रुपये किलोने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

नाफेड आणि एनसीसीएफ तसेच केंद्रीय भंडारच्या माध्यमातून कांद्याच्या बफर स्टॉकमधून तब्बल 25 टन कांद्याची विक्री करण्यात येणार आहे.