ऑनलाइन विज्ञान परीक्षा

मराठी विज्ञान परिषदेने सहावी-सातवीसाठी प्रथमा व आठवी-नववीसाठी द्वितीया परीक्षा, अशी मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमांतून ‘वेध 2035’ ऑनलाइन विज्ञान परीक्षा आयोजित केली आहे. परीक्षेमधून लिखित मजकूर, व्याख्याने तसेच प्रयोगांचे व्हिडीओ, विज्ञान-कोडी, कूट-प्रश्न, विज्ञान-खेळ अशी भरपूर अभ्यास सामग्री मिळणार आहे. शिक्षणतज्ञ-शास्त्र्ाज्ञांनी विकसन केलेली, विज्ञान विषयांवरील अभ्याससामग्री दोन महिन्यांत दर 15 दिवसांच्या अंतराने संकेतस्थळावर उपलब्ध होईल. प्रत्येक टप्प्याच्या शेवटी सराव चाचणी, नंतर दहा दिवसांच्या कालावधीत परीक्षा. गुणानुक्रमे पहिल्या येणाऱया विद्यार्थ्यांना दुर्बीण, द्विनेत्री, सूक्ष्मदर्शी यासारखी पारितोषिके तर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे दिली जाणार आहेत. 15 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाईल. परीक्षेसाठी https://mavipa.org/vedh2035 या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. प्रवेश प्रक्रिया 15 ऑगस्टपर्यंत सुरू होणार आहे.