अकरावी प्रवेशाचा अर्ज करण्याचे उरले फक्त दोन दिवस

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करण्यास शेवटचे दोन दिवस उरले आहेत. विद्यार्थी 16 जून रात्री 10 वाजेपर्यंत नियमित प्रवेश फेरी 1 साठी कॉलेज पसंतीक्रम अर्ज भाग 2 सादर करू शकतील. तसेच दिलेल्या मुदतीपूर्वी अर्जाचा भाग 2 लॉक करणे आवश्यक आहे. याच कालावधीत इनहाऊस आणि अल्पसंख्याक कोटय़ासाठी ऑनलाईन पसंती नोंदविता येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज भाग 1 ची पडताळणी झालेले विद्यार्थीच अर्ज भाग 2 भरू शकणार आहेत