
बुधवारची सकाळ उजाडली ती ‘ऑपरेशन सिंदूर’ची सुखद वार्ता घेऊन. मध्यरात्री सारे जग झोपले असताना हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी छावण्यांवर एअर स्ट्राईक करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. अवघ्या काही तासांत ही बातमी देशभरात पसरली आणि सर्वत्र आनंद, उत्साहाचे वातावरण पसरले. ‘पहलगामचा बदला घेतला…! न्याय मिळाला!’ अशा भावना व्यक्त करताना प्रत्येक देशवासीयाचा उर अभिमानाने भरून आला. घरोघरी, गल्लोगल्ली ‘ऑपरेशन सिंदूर’ची चर्चा सुरू झाली. क्षणात सोशल मीडियावरील स्टोरी, डीपी, स्टेटस बदलले. लष्कराचे कौतुक आणि अभिनंदन करणाऱया पोस्टने सोशल मीडिया भरून गेले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिवसभर ‘ऑपरेशन सिंदूर’ ट्रेंडिंगवर राहिले. याव्यतिरिक्त नारीशक्ती, कर्नल सोफिया कुरेशी, टेररिझम ट्रेंडिंगमध्ये दिसून आले. व्हॉट्सअॅपवर देशभक्तीपर संदेश, पह्टो, व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात शेअर झाले. अवघा सोशल मीडिया देशभक्तीत न्हाऊन गेला. काही मजेशीर मेसेजचीही देवाणघेवाण झाली. ‘हॅप्पी दिवाली.. पडोसियो’. ‘दो चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो पाकिस्तानीयों…’ ‘बिना सायरन के मॉक ड्रिल कर दिया’ असे काही मजेशीर मेसेजही फिरत होते.
सोशल मीडिया युजर्सनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावात अंतर्भूत असलेल्या खोल प्रतीकात्मकतेवर प्रकाश टाकला. हिंदुस्थानी महिलांचे सामर्थ्य आणि बलिदानाला श्रद्धांजली म्हणून अनेकांनी या नावाकडे पाहिले. पत्रकार परिषदेत लष्कराच्या वतीने ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱयांनी दिली. लष्कराच्या या निर्णयाला नेटिजन्सनी मोठा प्रतिसाद दिला. पत्रकार परिषदेतील दोघींचे पह्टो मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाले. ंिहदुस्थानी सरकार आणि हिंदुस्थानी लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू राहिला.
सेलेब्रेटींनी व्यक्त केल्या भावना
पाकव्याप्त कश्मीरमध्ये हिंदुस्थानने केलेल्या कारवाईनंतर अनेक सेलेब्रेटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये अनेक सेलेब्रेटी, बॉलीवूड स्टार मागे नव्हते. सुपरस्टार रजनीकांत, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर अल्लू अर्जुन, अक्षय कुमार, रितेश देशमुख, सुनील शेट्टी, रवीना टंडन, निम्रीत काwर, रोहित शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा अशा अनेकांनी सरकारचे आणि लष्कराचे कौतुक केले.