Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोन हिंदुस्थानात लॉन्च, मिळणार 64MP चा कॅमेरा; किंमत फक्त…

स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने आपला नवीन हँडसेट Oppo Reno 5 Pro 5G हिंदुस्थानात लॉन्च केला आहे. हा नवीन स्मार्टफोन दिसायला आकर्षक असून यात MediaTek Dimensity 1000+ प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय Reno 5 Pro 5G मध्ये ग्राहकांना दमदार बॅटरीसह क्वाड कॅमेरा सेटअप मिळणार आहे. हा स्मार्टफोन कंपनीने सर्वात आधी चीनमध्ये लॉन्च केला आहे.

Oppo Reno 5 Pro 5G स्पेसिफिकेशन

Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने MediaTek Dimensity 1000+ प्रोसेसर, 8 जीबीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. यासोबतच यात ग्राहकांना 65W SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी 4,350mAh ची बॅटरी मिनार आहे. या हँडसेटमध्ये 4 जी एलटीई, ड्युअल बँड वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ 5.1 आणि यूएसबी टाइप-सी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स दिले आहेत. करणार आहे.

प्रोसेसर आणि कॅमेरा

कंपनीने Oppo Reno 5 Pro 5G मध्ये 6.55 इंचचा FHD+ OLED डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रेझोल्यूशन 1,080 x 2,400 पिक्सेल आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. ज्यात 64MP प्राइमरी सेन्सर, दुसरा 8MP चा अल्ट्रा वाईड एंगल लेन्स, तिसरा 2MP मॅक्रो लेन्स आहे, तर चौथे 2MP मोनो पोर्ट्रेट लेन्स आहे. तसेच सेल्फीसाठी याच्यापुढील बाजूस 32 MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत

Oppo Reno 5 Pro 5G ची हिंदुस्थानात 35,990 रुपये इतकी किंमत ठेवण्यात आली आहे. या किंमतीत 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. याची विक्री 22 जानेवारीपासून सुरु होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या