दुहेरी नागरिकत्व प्रकरणी राहुल गांधी यांच्या चौकशीचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुहेरी नागरिकत्व प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचादेखील अदेश दिला आहे. कर्नाटकमधील भाजप कार्यकर्ता एस. विग्नेश शिशिर याच्या याचिकेवर न्या. सुभाष विद्यार्थी यांनी हा आदेश दिला. विग्नेश यांनी राहुल गांधी यांच्यावर ब्रिटिश नागरिकत्व घेतल्याचा आरोप केला होता. 28 जानेवारी 2026 रोजी एमपी-एमएलए न्यायालयाने विग्नेश शिशिर यांची ही याचिका फेटाळली होती. नागरिकत्वाबाबत कोणताही नवा पुरावा सादर करण्यात आलेला नसल्याचे न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले होते.