
जगभरातील सिनेविश्वाचं लक्षं लागलेल्या 97 व्या अकादमी पुरस्कार सोहळा 3 मार्च रोजी (हिंदुस्थानात 4 मार्च रोजी) लॉस एंजेलिस येथे पार पडला. यावेळी सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘अनोरा’ ने 97 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये बाजी मारल्याचं पाहा
यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार अॅड्रियन ब्रॉडी याने तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिकी मॅडिसन हिने पटकावला. शॉन बेकरचा ‘अनोरा’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला.
Oscar 2025 च्या नामांकनांमध्ये एमिलिया पेरेझ, द ब्रुटालिस्ट, अनोरा आणि इतर चित्रपटांचा समावेश होता.
Oscar 2025 full winners list
सर्वोत्कृष्ट चित्रपट: अनोरा
सर्वोत्कृष्ट अभिनेता: द ब्रुटालिस्टसाठी अॅड्रियन ब्रॉडी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: अनोरासाठी मिकी मॅडिसन
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: अ रिअल पेनसाठी कायरन कल्किन
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: एमिलिया पेरेझसाठी झो सलडाना
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: अनोरासाठी शॉन बेकर
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण: द ब्रुटालिस्टसाठी लोल क्रॉली
सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा: अनोरासाठी शॉन बेकर
सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा: कॉन्क्लेव्ह
सर्वोत्कृष्ट मूळ संगीत: द ब्रुटालिस्टसाठी डॅनियल ब्लूमबर्ग
सर्वोत्कृष्ट ध्वनी: ड्यून भाग दोन
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट: ड्यून भाग दोन
सर्वोत्कृष्ट मूळ गाणे: एमिलिया पेरेझमधील एल माल
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्य चित्रपट: आय एम स्टिल हिअर
सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट: द ओन्ली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा
सर्वोत्कृष्ट संपादन: अनोरा
सर्वोत्कृष्ट माहितीपट फिचर फिल्म: नो अदर लँड
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिल्म: फ्लो
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट: इन द शॅडो ऑफ द सायप्रस
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइन: पॉल टेझवेल – विक्डसाठी
सर्वोत्तम मेकअप आणि हेअर स्टायलिंग: द सबस्टन्स
सर्वोत्तम प्रोडक्शन डिझाइन: विक्ड
सर्वोत्तम लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म: आय एम नॉट अ रोबोट