कोरोना काळात केलेल्या अन्नदानाची ‘डेटॉल’ने घेतली दखल, हँडवॉशच्या बॉटवर छापला फोटो

तालुक्यातील कसबे तडवळे येथील मनिषा वाघमारे या तरुणानीने कोरोना काळात केलेल्या अन्नदानाची दखल घेत डेटॉल या कंपनीने ’डेटॉल सॅल्युटस्’ या अभियानांतर्गत सदरील युवतीचा फोटो त्यांच्या हँडवॉशवर छापला आहे. मनिषा वाघमारे या तरुणीने केलेल्या कामाची दखल राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतली आहे.

कोरोनाची दुसऱया लाटेत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत होती. सर्व शासकीय दवाखान्यासह खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांनी भरली होती. यादरम्यान शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची अडचन होत होती. ही बाब लक्षात घेवून धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील मनिषा वाघमारे या उच्चशिक्षीत तरुणीने आपण कांही तरी मदत केली पाहिजे या भावनेतून कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जेवनाचे डब्बे देण्याचे ठरविले.

वास्तविक, वडीलांचे छत्र हरवलेले. त्यामुळे कुटूंबाची जवाबदारी आईवर, घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. परंतू सर्व अडचणीवर मात करत मनिषा वाघमारे हीने सुमारे महिनाषभर दररोज शंभर ते दिडशे डब्बे तयार करुन 30 किलोमिटरचा प्रवास करुन हे डब्बे धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना देत होत्या. या कामी त्यांची आई, बहीन तसेच मित्र, मैत्रिनींनी त्यांना या कामी मोठी मदत केली.

दरम्यान, मनिषा वाघमारे यांनी कोरोना काळात केलेल्या अन्नदानाची दखल ’डेटॉल’ या राष्ट्रीय कंपनीने घेतली आहे. त्यांनी आपल्या डेटॉल हँडवाश या उत्पादनावर ’डेटॉल सॅल्युटस्’ या शिर्षकाखाली मनिषा यांच्या फोटोसह त्यांनी केलेल्या कामाची माहिती छापली आहे. तसेच मनिषा यांना ’डेटॉल’ कंपनीकडून मानपत्रही देण्यात येणार आहे. याबाबत ’डेटॉल’ कडून त्यांच्या व्टिटर हॅडलवरुन माहितीही प्रसिध्द करण्यात आली आहे.

कोरोना काळात केलेल्या कामाची ’डेटॉल’ या राष्ट्रीय पातळीवरील कंपनीने दखल घेतली, ही खूप आंनदाची बाब आहे. कोरोनाची लाट ओसरली असली तरी माझे समाज कार्याचे काम असेच सुरु राहिल. – मनिषा वाघमारे.

आपली प्रतिक्रिया द्या