धाराशिवमध्ये आज 206 कोरोना पॉझिटीव्ह, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दीड हजाराच्या पुढे

351

धाराशिव जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचे आकडे नवनवे उच्चांक प्रस्थापीत करत आहेत. आज सोमवार, 9 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात 206 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झाली एकूण आकडा 2 हजार 468 एवढा झाला आहे. 814 रुग्ण उपचारांनतर घरी गेले असून 1 हजार 590 रुग्णावर जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव येथील जिल्हा सामान्य रुग्णलयातून संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्रात संशयित रुग्णांचे 420 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 355 स्वॅबचा तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला आहे. यामध्ये 173 निगेटीव्ह, 156 पॉझिटीव्ह, 26 अहवाल अनिर्णित तर 65 अहवाल प्रलंबित आहेत. तसेच अँटीजेन टेस्टकिटच्या माध्यमातून करण्यात आलेल्या टेस्टींगमध्ये 50 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 206 झाली आहे.

पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये धाराशिव तालुक्यात 37, तुळजापूर 47, उमरगा 19, कळंब 49, परंडा 24, लोहारा 11, भूम 18 तर वाशी तालुक्यात 1 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला आहे. धाराशिव शहरातील विधाते हॉस्पीटल येथे 10, खाजा नगर 3, तेर 3, काजळा 3 तर सांजा रोड भागात 3 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय 10, तालुक्यातील काटी 10, तुळजापूर खुर्द 8, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय 12 रुग्ण आढळून आले आहेत. उमरगा तालुक्यातील अजय नगर 5 येथे पाच रुग्ण आढळून आले आहेत. कळंब तालुक्यात मोठय़ा प्रमाणात रुग्ण वाढत असून आज जिजाऊ नगर 5, सावरगाव 5, पापडे गल्ली 2, कोथळा 4, बोरगांव 7, दहीफळ 7, खामसवाडीत 5 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. परंडा येथेही रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असून नालसाब गल्ली 4, पल्ला गल्लीत 8 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. भूम येथे 7 तर तालुक्यातील ईट येथे 9 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 2 हजार 468 एवढा झाला आहे. 814 रुग्ण उपचारांनतर घरी गेले असून 1 हजार 590 रुग्णावर जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 64 जणांचा आत्तार्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या