स्टोक्सची डिसिल्व्हाच्या विक्रमाशी बरोबरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। ओव्हल

इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटर बेन स्टोक्सने गुरुवारी ओव्हलवरील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या विश्वचषक लढतीत 89 धावा, 2 विकेट, 2 झेल आणि 1 रनआऊट अशी अफलातून कामगिरी करीत श्रीलंकेच्या अरविंदा डिसिल्व्हाच्या 23 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

1996 च्या विश्वचषक अंतिम लढतीत अरविंदा डिसिल्व्हाने लाहोरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 107 धावा, 3 विकेट आणि 2 झेल अशी विक्रमी कामगिरी साकारली होती. डिसिल्व्हाच्या त्या कामगिरीमुळेच श्रीलंकेने पहिल्यांदा विश्वचषक पटकावण्याचा भीमपराक्रम साकारला होता. स्टोक्सने डिसिल्व्हाच्या त्या विक्रमाशी बरोबरी साधली.