तीन महिन्यांत 51 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2026 च्या सुरुवातीच्या अवघ्या तीन महिन्यांत 51 हजार कर्मचाऱयांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. कंपन्या एआय क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत असल्याने ओरॅकल, मेटा आणि अॅमेझॉनने नोकर कपात करायला सुरुवात केली आहे. अॅमेझॉनने जानेवारीत 16 हजार नोकऱ्या कमी केल्या आहेत. एटलॅसियन कंपनीने मार्च महिन्यात 1600 कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनी या पैशांचा वापर एआय रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये करणार आहे. ब्लॉक इन्कने फेब्रुवारीमध्ये चार हजार कर्मचाऱयांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले होते.