एसी लोकलमधून दोन लाखांवर प्रवाशांचा ‘फुकट’ प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱया प्रवाशांचा टक्का वाढला आहे. मागील वर्षभरात पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर दोन लाखांहून अधिक प्रवाशांनी एसी लोकलमधून अनधिकृत प्रवास केला. त्यांच्याकडून सात कोटींचा दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वे मार्गावर एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 यादरम्यान अनधिकृत प्रवाशांवर कारवाईची मोहीम राबवण्यात आली. यादरम्यान एसी लोकलमधून अनधिकृत प्रवास करणाऱया 1 लाख 10 हजार प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून 3.51 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच पश्चिम रेल्वेवर गेल्या वर्षभरात 1 लाख 16 हजारांहून अधिक विनतिकीट प्रवाशांना एसी लोकलमधून प्रवास करताना पकडण्यात आले. प्रशासनाने त्यांच्याकडून 3.76 कोटींचा दंड वसूल केला.