खंडाळय़ाच्या बोगद्यात कन्याकुमारी एक्प्रेसचे प्रवासी घुसमटले

537

ओव्हरहेड वायर तुटल्याने खंडाळय़ाजवळील बोगद्यात कन्याकुमारी एक्प्रेस अडकल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. इंजिनसह तीन डबे बोगद्यात दोन तास फसल्याने प्रवाशी अक्षरशः घुसमटले. कर्जतवरून डिझेल इंजिन आणल्यानंतर ही गाडी पुण्याच्या दिशेने रवाना झाली. मात्र या घटनेने पुण्याच्या दिशेची वाहतूक तीन तास ठप्प झाली होती.

मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कन्याकुमारी एक्प्रेस मंकी हिल ते स्टेशन ठाकुरवाडी यादरम्यान असलेल्या 111 क्रमांकाच्या बोगद्यात पोहोचताच ओव्हरहेड वायर तुटली. या घटनेत कातळाचा भलामोठा भाग गाडीवर कोसळला. हा प्रकार लक्षात येताच मोटरमनने इमर्जन्सी बेक दाबून गाडी थांबवली. त्यानंतर कर्जत स्थानकातून आलेल्या डिझेल इंजिनद्वारे एक्प्रेस पुढे काढून ओव्हरहेड वायरचे काम सुरू करण्यात आले. मात्र या सर्व घटनेत तीन डबे बोगद्यात अडकले होते. त्यामुळे अंधारात प्रवाशांना घुसमटल्यासारखे झाले.

आपली प्रतिक्रिया द्या