‘एलियन्स’सारखे दिसणाऱ्या घुबडांचा व्हिडीओ व्हायरल

2970

पृथ्वीतलावर कोट्यवधी प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. डोळ्यांनाही दिसणार नाही एवढा सुक्ष्म आणि कवेतही मावणार नाही एवढा प्रचंड प्राणीही या पृथ्वीतलावर आपल्याला आढळून येतो. अनेकदा काही विचित्र प्राणी, पक्षीही आपल्याला दिसून येतो. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून यातील घुबडं एलियन्ससारखे दिसत आहेत.

डॅनियल होलाँड या ट्विटर युझरने हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. गेल्या दोन वर्षापासून हा व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असून या व्हिडीओत एलियन्ससारखे दोन घुबडं दिसत आहेत. बटबटीत डोळे आणि अंगावर केस नसणारी ही दोन घुबडं पाहूण एलियन्सचीच आठवण होती, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

2017 मध्ये या घुबडांचा व्हिडीओ पहिल्यांदा व्हायरल झाला होता. विशाखापट्टणम येथे बांधकाम सुरू असणाऱ्या एका इमारतीमध्ये मजुराने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात या घुबडांचा व्हिडीओ चित्रित केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हे एलियन्ससारखे दिसत असल्याचे म्हटले. परंतु डॅनियल यांनी मात्र हे एलियन्स नसून पूर्ण वाढ न झालेले घुबडाचे पिल्लं आहेत असे म्हटले आहे. पूर्ण वाढ न झाल्याने त्यांच्या अंगावर संपूर्ण केस आलेले नाही, त्यामुळे ते एलियन्ससारखे भासत आहेत, असेही तो म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या