मोलकरणीने पगार मागितला, मालकिणीने केली शरीरसंबंधाची मागणी! नकार देताच अंगावर कुत्रा सोडला

14768

मोलकरणीने पगार मागितला म्हणून तिच्या अंगावर कुत्रा सोडल्याची भयंकर घटना दिल्लीत घडली आहे. सपना असं या मोलकरणीचं नाव असून तिच्या मालकिणीचं नाव रजनी सिंह असं आहे. रजनी हिने शरीरसंबंधाची मागणी केल्याचा आरोपही सपना हिने केला आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर येथे घडली. सपना ही रजनी सिंह यांच्याकडे काम करत होती. दरम्यान लॉकडाऊन झाल्यानंतर बराच काळ कोरोनाच्या भीतीने सपना रजनी यांच्याकडे कामाला आली नव्हती. त्यामुळे रजनी तिला वारंवार फोन करून बोलवत होती. मात्र, सपना त्याला नकार देत होती. दरम्यान, सपनाच्या पगाराची काही शिल्लक रजनी यांच्याकडे बाकी होती. ती शिल्लक द्यावी अशी विनंती सपना रजनीकडे करत होती.

अखेर 11 जून रोजी सपना आपले पैसे घेण्यासाठी रजनी सिंह यांच्या घरी पोहोचली. तिथे तिने रजनीकडे आपल्या पगाराची मागणी केली. तेव्हा रजनीने तिला पैसे द्यायला नकार दिला. त्याबदल्यात तिने शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. सपनाने त्याला नकार देताच रजनीने तिच्यावर कुत्रा सोडला. कुत्र्याने हल्ला केल्याने सपनाचा चेहरा आणि गळ्यावर गंभीर जखमा झाल्या. या प्रकाराने घाबरलेल्या सपनाने पोलिसात तक्रार केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या