जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकावरून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची माफी, पुरावे नसल्याचे म्हणत 22 वर्षांनी झाली उपरती

‘शिवाजी ः हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया’ या 22 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता. त्याबद्दल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने छत्रपतींचे थेट तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांची माफी मागितली आहे. प्रकाशन संस्थेने माफीनाम्याची जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 13 फेब्रुवारी 2003 रोजी हे पुस्तक प्रकाशित केले होते. अमेरिकन इतिहास अभ्यासक जेम्स लेन यांनी ते लिहिले होते. पुस्तकाच्या 31, 33, 34 आणि 93 या पानांवर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची आई राजमाता जिजाऊंबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता.