ग्राहकाचा विनोदी पत्ता; फ्लिपकार्टचे गंमतीशीर उत्तर…वाचा सविस्तर

ऑनलाइन कपंन्याबाबत ग्राहकांच्या तक्रारीबाबत नेहमी चर्चा होते. ऑनलाइन मागवलेल्या वस्तूऐवजी दुसरीच वस्तू पाठवण्यात आल्याचे अनेकजण सांगतात. मात्र, राजस्थानच्या कोटामध्ये एक वेगळाच प्रकार घडला आहे. ऑनलाइन वस्तू मागवण्यासाठी ग्राहकाने दिलेला पत्ता विनोदी असून त्या पत्त्याला फ्लिपकार्टनेही गंमतीशीर उत्तर दिले आहे. सध्या सोशल मिडीयावर हा पत्ता आणि फ्लिपकार्टचे उत्तर व्हायरल होत आहे. त्यावर अनेक यूजर्स कमेंटही करत आहेत.

एका ट्विटर यूजरने फ्लिपकार्टवरच्या या पत्त्याचे फोटो अपलोड केले आहेत. त्यात ग्राहकाचा पत्ता या रकान्यात राजस्थानमधील कोटा येथील ग्राहकाने लिहिलेला पत्ता विनोदी आहे. ”448 चौथ माता मंदिर, मंदिराजवळ आल्यावर मला फोन करा, मी वस्तू घ्यायला येईन.” असे ग्राहकाचा पत्ता या रकान्यात लिहिले आहे. एका यूजरने हा फोटो शेअर करत ‘हिंदुस्थानी ई कॉमर्स वेगळ्या प्रकारचे आहे,’ असे म्हटले आहे. हा फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या फोटोला 14 हजार लाइक्स मिळाले आहेत. तर तीन हजारवेळा हा फोटो रिट्विट करण्यात आला आहे. 9 जुलैला हा फोटो शेअर करण्यात आला होता.

फ्लिपकार्टनेही या पत्त्याचा फोटो शेअर करत यावर गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. ‘घर एक मंदिर आहे, ही संकल्पना आम्ही एका वेगळ्या स्तरावर नेत आहोत’ असे गंमतीशीर उत्तर फ्लिपकार्टने दिले आहे. या फोटोवरही अनेक यूजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या ऑडर ग्राहकांपर्यत कशा पोहचवायच्या, यावर जेफ बजोस विचार करत आहेत, असे एका यूजरने म्हटले आहे. तर राजस्थानातील माणसाची प्रत्येक गोष्टीच वेगळी असते, असे एका यूजरने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या