जालन्यातील पद्मावती धरण ओहरफ्लो

जालना जिल्ह्यातील पारधपासून जवळच असलेले पद्मावती धरण २३ सप्टेंबरला 100 टक्के भरले आहे. त्यामुळे परिसरातील 10 ते 15 गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

2024 च्या पावसाने सुरवातीस थोडा विलंब केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काळजी निर्माण झाली होती. परंतु गेल्या दोन ते तिन दिवसापासून पावसाने दमदार सुरवात केली असून मागील आठवड्यात भोकरदन तालुक्यातील अनेक भागात कमीअधिक पाऊस झाला. त्यामुळे पद्मावती धामणा धरणही ओहरफ्लो झाले आहे. पद्मावती धरणाने पारधसह परिसरातील वालसावगी,पारध खुर्द, पद्मावती, वाढोणा, विझोरा तर बुलढाणा जिल्ह्यातील मासरूळ,तरारखेड,गुम्मी,धामणगाव,मढ,पाडळी देऊळघाट आदी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून दमदार पावसाने नदी नाले खळखळ वाहत आहे.

शेतातील विहीरीही भरून वाहत आहेत. असे असले तरी ‘कही गम कही खुशी’याप्रमाणे गेल्या दोन आठवड्यापासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे पिकावर परिणाम होत आहे. सोयाबीन सडण्यास सुरवात झाली ,उडीद मुंग ,तीळ हे पिके हातची गेली आहेत.