India vs Pakistan Match – थोडी तरी लाज बाळगा! पीडित कुटुंबीयांचा आक्रोश

पहलगाम हल्ल्यात बळी गेलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिने सरकारवर जोरदार हल्ला केला. ‘पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे म्हणजे अप्रत्यक्षरीत्या दहशतवादाला व निष्पाप लोकांच्या मृत्यूला आमंत्रण आहे. थोडी तरी लाज बाळगा, असा संताप आसावरी हिने व्यक्त केला.

पैसा किती मिळतोय यावर तुमची देशभक्ती ठरणार का?

‘पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला सहा महिनेही झालेले नाहीत. आम्ही जे काही भोगतोय त्याची कल्पना दुसरा कोणी करू शकत नाही, पण किमान संवेदनशीलता असायला हवी. सरकार आणि बीसीसीआयमध्ये तसे काहीच दिसत नाही. जवान, नागरिक मरतायत याचे यांना काही पडलेलं नाही. पैसा किती मिळतोय यावर तुमची देशभक्ती ठरणार आहे का,’ असा सवाल संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिने केला.

‘पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे म्हणजे दहशतवादाला फंडिंग करण्यासारखे आहे. या आणि आम्हाला मारा असे म्हणून त्यांना आमंत्रण देण्यासारखे आहे. केवळ व्यापार करार मोडून, पाणी बंद करून संबंध तुटले असे होत नाही. सरकारला खरंच शहीदांबद्दल, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती असेल तर यापुढे त्यांनी पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवू नये, अन्यथा पहलगामनंतर सरकारने व्यक्त केलेल्या सगळय़ा भावना खोटय़ा होत्या हेच सिद्ध होईल, असे आसावरी म्हणाली.

क्रिकेटपटूंनो, विचार करा!

पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास विरोध करणाऱया क्रिकेटपटूंनाही आसावरीने आरसा दाखवला. ‘देशातल्या क्रिकेटपटूंना तरुण पिढी हीरो मानते. त्यांनी आमचे हीरो राहायचे की नाही हे ठरवण्याची ही वेळ आहे. ज्यांच्या हाताला रक्त लागलंय, त्यांच्यासोबत आपण खेळतोय याची जाणीव त्यांनी ठेवावी. किमान देशाच्या आणि स्वतःच्या सन्मानासाठी तरी खेळण्यास नकार द्या, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.

पहलगाम हल्ल्यानंतर देशात अचानक देशभक्तीची लाट आली होती. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असे बोलले गेले, पण पाकिस्तानशी मॅच झाली तर हा केवळ एक डायलॉग राहील.

क्रिकेटकडे खेळ म्हणून पाहा म्हणणारे अजित पवार ट्रोल

क्रिकेट मॅचकडे खेळ म्हणून पाहिले पाहिजे, त्यात राजकारण आणता कामा नये, असे म्हणणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ट्रोल झाले. तुमचे कोणी गेले नाही म्हणून तुम्हाला हे सुचते आहे, अशी टीका नेटकऱ्यांनी केली.

माझ्या लोकांचं रक्त सांडलं त्यांच्याशी आपण का खेळावं

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनीही पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यास विरोध दर्शवला. ‘माझ्या लोकांचं रक्त सांडणाऱयांच्या सोबत मी का खेळावं? हिंदुस्थानने खेळू नये’, असे स्पष्ट मत त्यांनी नोंदवले.

तोपर्यंत पाकिस्तान सुधारणार नाही 

वडील गमावलेल्या हर्षलचा संताप

 पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा सर्कत्र निषेध होत आहे. पहलगाम हल्ल्यात वडील गमाकलेल्या डोंबिवलीतील हर्षल लेले यानेही मोदी सरकारकिरोधात तीक्र संताप क्यक्त केला. जोपर्यंत पूर्ण बहिष्कार टाकत नाही तोपर्यंत पाकिस्तान सुधारणार नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया त्याने क्यक्त केली.पहलगाम हल्ल्यात डोंबिकलीतील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांचा हकनाक बळी गेला. हर्षल हा संजय लेले यांचा मुलगा आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट नको अशी देशवासीयांसह पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी मागणी करूनही सरकार आणि बीसीसीआयने याकडे दुर्लक्ष केले. यापार्श्वभूमीवर नाराजी व्यक्त करताना हर्षल याने आता पाकिस्तानसोबत अजिबात सामने खेळू नये, असे स्पष्ट मत क्यक्त केले. आधी मला काटायचं की राजकारण केगळे असाके आणि खेळ वेगळा असावा. पण पहलगाम हल्ल्यानंतर आता तसं वाटत नाही. कारण हे सगळं एकमेकांशी जोडलेले आहे. पाकिस्तानला सर्क बाजूंनी एकटे
पाडले पाहिजे, असेही तो म्हणाला.