Pahalgam Attack – “लोक कश्मिरी आणि मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवत आहेत…”; नौदल अधिकाऱ्याच्या पीडित पत्नीनं केलं आवाहन

फोटो सौजन्य - IANS

कश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात हरयाणाचे नौदलातील अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांचाही मृत्यू झाला होता. विनय नरवाल यांचा आज वाढदिवस होता. आणि विनय यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबाने हरयाणातील कर्नाल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यावेळी त्यांची पत्नी हिमांशीने आपल्या भावना व्यक्त केल्या. “संपूर्ण देशाने विनयसाठी प्रार्थना करावी, अशी आपली इच्छा आहे. तो जिथे असेल तिथे आनंदी राहू दे”, असे विनय यांची पत्नी हिमांशी म्हणाल्या.

मला कोणाबद्दल कुठलाही द्वेष नाही. लोक मुस्लिम आणि कश्मिरिंविरोधात द्वेष पसरवत आहेत. आम्हाला असे नको आहे. आम्हाला शांतता हवी आहे. न्याय मिळालाच पाहिजे, ज्यांनी हे घडवले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही सर्व विनयच्या आठवणीत रक्तदान करत आहोत, अशी भावना हिमांशी यांनी व्यक्त केली.

Pahalgam Attack Update – बंदी घातलेल्या हुर्रियतच्या संघटनांकडून दहशतवाद्यांना मदत? NIA चे कश्मीरमध्ये छापे

रक्तदान शिबिरात व्यासपीठावर बसलेल्या हिमांशी यावेळी अनेकदा भावुक झाल्या. विनय यांचे कुटुंबीय यावेळी ॐ शांतिचा जप करत होते. हिमांशी यांनी यावेळी उपस्थित असलेल्या आमदार आणि लोकप्रतिनिधींना आपल्या हातावरची मेहंदीही दाखवली, ज्यावर विनय यांचे नाव लिहिलेले आहे. यावेळी हिमांशी आणि विनय यांची आई दोघीही भावुक झाल्या होत्या. व्यासपीठावरून उतरल्यानंतर दोघी एकमेकांना बिलगल्या आणि टाहो फोडला. त्यांचे अश्रू पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.

माझा भाऊ विनय नरवालला शहीदाचा दर्जा द्यावा, अशी मागणी वडिलांनी सरकारकडे केली आहे. आणि सरकार यावर विचार करत आहे, असे विनय यांची बहीण सृष्टीने यावेळी सांगितले.

लष्कराचं मनोबल कमी करू नका! पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी SC ने फेटाळली