पैठणचे संतपीठ जानेवारीमध्ये कार्यान्वित होणार-उदय सामंत

अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले पैठणचे संतपीठ येत्या जानेवारी महिन्यात कार्यान्वित होणार आहे, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ही स्वायत्त संस्था असून यासाठी 22 कोटी रुपये खर्च येणार आहेत, असेही ते म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. यासंदर्भात आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत शहरात आले होते, त्याप्रसंगी ते पत्रकारांशी ते बोलत होते. याप्रसंगी फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पैठण येथे जगद्गुरू संत एकनाथ महाराज यांच्या नावाने हे संतपीठ कार्यान्वित केले जात आहे, हे स्पष्ट करून उदय सामंत म्हणाले, यासंबंधी महिनाभरात जीआर काढण्यात येणार असून संतपीठ कार्यान्वित करण्यासाठी 22 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च तूर्त विद्यापीठातून केला जाणार आहे, खर्च झालेला तो पैसा शासनाकडून दिला जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे वारकऱ्याच्या मागणीला खNया अर्थाने मूर्त रूप येणार आहे. यासाठीचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना संकटाच्या काळात 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाNया अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला असता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार या परीक्षा होत आहेत. विद्याथ्र्यांचे हित लक्षात घेऊन ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार असून 1 लाख 16 हजार 400  विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये बॅकलॉगचे 36 हजार 208 विद्यार्थी राहणार आहेत. या परीक्षेचा महिनाभरात निकालही लावला जाणार आहे, 90 टक्के विद्यार्थी ऑनलाईन आणि उर्वरित 10 टक्के विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देतील, असेही सामंत म्हणाले. दरम्यान विद्यापीठ गेट मंत्र्यांची गाडी आडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्याथ्र्यांना पोलिसांनी रोखले.

विद्यापीठाचे विभाजन होणार नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे कष्टाने उभारले गेले आहे, राज्य सरकारच्या नावे विरोधक राजकारण करीत आहेत. धाराशिव उपकेंद्र विद्यापीठापासून वेगळे करण्याचा कुठलाही हेतू नाही, तसा सरकारच्या समोर प्रस्तावही नाही, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. आंदोलन करणाNयांनी आगोदर तो जीआर पाहून घ्यावा, नीट वाचावा. विद्यापीठाच्या धाराशिव उपवेंâद्र परिसराच्या विकासासाठी ती समिती गठित करण्यात आली आहे, ती समिती विभाजनासाठी नाही, विद्यापीठाचे दोन भाग करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही, विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या