पाकिस्तान जगासाठी व्हायरस!

755

कश्मीरवरून जगभरात हिंदुस्थानविरोधात प्रचार करणाऱ्या पाकिस्तानचे तोंड घरच्याच लोकांनी फोडले आहे. न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानमधील कराची, बलुच, खैबर, पख्तूनवा लोकांच्या प्रतिनिधींनी पाकिस्तानच मानवाधिकारांचे उल्लंघन करत असल्याची डिजिटल पोस्टर्स रस्तोरस्ती उभ्या केलेल्या ट्रकवर मांडून पाकिस्तान हा जगासाठी व्हायरस असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आणला आहे.

पाकिस्तान सरकारने कश्मीरचा मुद्दा जगासमोर मांडत आहे. पण पाकिस्तान ढोंगी असून कराची, बलुच, खैबर, पख्तूनवामधील त्यांच्याच लोकांवर कसे अत्याचार करत आहे, याचे ‘चित्रमय दर्शन’ न्यूयॉर्कच्या रस्त्यारस्त्यावर दिसत आहे. पाकिस्तान उघडपणे मानवाधिकारांचे उल्लंघन करत आहे, अशी पोस्टर्स न्यूयॉर्कच्या रस्तोरस्ती झळकली. मुहाजीरांची संघटना असलेली ‘वॉईस ऑफ कराची’, बलूच लोकांची ‘फ्री बलूचिस्तान मुव्हमेंट’ या संघटनांनी पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला आणि पाकिस्तान जगासाठी कसा धोकादायक बनला आहे, याचे ‘चित्र’ जगासमोर उभे केले.

आपली प्रतिक्रिया द्या