वेळ पडल्यास पाकिस्तानातही घुसू! लष्करप्रमुख रावत यांचा पुन्हा इशारा

704

कश्मीरमधून 370 कलम हटवल्यापासून पाकिस्तानने कश्मीर आणि देशभरात दहशतवादी कारवाया करण्याचे कट रचले आहेत. बालाकोटमधील दहशतवाद्यांचा तळही पुन्हा सुरू झाला आहे. पण दहशतवाद्यांना आमच्या सीमेत घुसू देणार नाही. वेळ पडल्यास पाकिस्तानच्या सीमेत पुन्हा घुसू आणि दहशतवाद्यांचा खात्मा करू, असा इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानला दिला आहे.

हिंदुस्थानी सेनेच्या सर्जिकल आणि एअर स्ट्राइकने काय साध्य झाले असा प्रश्न रावत यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ‘या दोन्ही स्ट्राइकनी आम्ही पाकिस्तानला संदेश दिला आहे की, जोपर्यंत सीमेपलीकडून आमच्यावर हल्ला होत नाही तोपर्यंत आम्ही सीमा पार करणार नाही. सीमा पार करायचीच झाली तर जमीन आणि हवाई किंवा अन्य कोणत्याही मार्गानेही करू.’ पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि दहशतवाद्यांच्या संबंधांवर बोलताना ते म्हणाले,‘पाकिस्तानी लष्कर, आयएसआय हे दहशतवाद्यांसाठी काम करत आहेत, हातात हात घालून हिंदुस्थानविरोधात काम करत आहेत. पाकिस्तानच्या छुप्या युद्धनीतीचा हा भाग आहे.’

अण्वस्त्रांचा वापर युद्ध थांबवण्यासाठी!
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देत आहेत. त्यावर बोलताना रावत म्हणाले, ‘युद्धात अण्वस्त्रांचा वापर हा युद्ध थांबवण्यासाठी केला जातो. अण्वस्त्रे ही पारंपरिक युद्धासाठी बनलेली नाहीत. जग अण्वस्त्रांचा वापर करायला कधीच परवानगी देणार नाही. अण्वस्त्रांबाबतची पाकिस्तानची विधाने ही त्यांचा बालिशपणाच दाखवत आहेत.’

आपली प्रतिक्रिया द्या