पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, पूंछमध्ये वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन

523

कोरोना विषाणूच्या संकटातही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असल्याचं चित्र आहे. मंगळवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. हिंदुस्थानी सीमेनजीक बालाकोट येथे पाकिस्तानकडून मोर्टार डागण्यात आले आहेत. त्याला हिंदुस्थानी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

पाकिस्तानी सैन्याकडून यापूर्वीही 22 मे रोजी पूंछ जिल्ह्यात कृष्णा घाटी सेक्टर परिसरात मोर्टार डागले गेले होते. शिवाय, गोळीबारही झाला होता. त्याला हिंदुस्थानी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर काही काळ पाकिस्तानकडून काही हालचाल नव्हती. पण, थोड्याच वेळात राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टरमध्ये पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं.

19 मे आणि 20 मे रोजीही पूंछ भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं. 19 मे राजी बालाकोट परिसरातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून मोर्टारचा मारा झाला होता. तर, 20 मे रोजी दिगवार सेक्टरमध्येही गोळीबार करण्यात आला. या दोन्ही हल्ल्यांना हिंदुस्थानी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं.

आपली प्रतिक्रिया द्या