पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद

686

जम्मू कश्मीरमधील नौशेरा सेक्टरमधील मुख्य नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. नायक सुभाष थापा असे त्या जवानाचे नाव आहे.

पाकिस्तानने नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवळपास दोन तास पाकिस्तानकडून गोळीबार सुरू होता. हिंदुस्थानी जवानांनी देखील पाकड्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र पाकिस्तानच्या गोळीबारात जवान सुभाष थापा जखमी झाले. त्यांना तत्काळ उधमपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या