पाकिस्तानच्या ‘शाहिन’ची आंधळी कोशिंबीर, व्हिडीओ पाहाल तर हसून हसून पोट दुखेल

3457

क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. येथे फलंदाज, गोलंदाजासह क्षेत्ररक्षकाचीही भूमिका तितकीच महत्वाची असते. दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू जॉन्टी ऱ्होडस यांनी क्षेत्ररक्षकही सामना फिरवू शकतो हे अनेकदा दाखवून दिली. यात टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंह, मोहम्मद कैफ, सुरेश रैना, रविंद्र जाडेजा यांनीही भर घातली आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली तर फलंदाजाला वेसन घालण्याचे काम लिलया होऊ शकते हे दाखवून दिले.

मात्र क्रिकेटमध्ये मैदानावर बऱ्याचदा मजेशीर किस्से घडत असतात. आता हेच पाहा ना नुकत्याच अॅडलेड येथे झालेल्या कसोटी लढतीत मजेशीर प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. विशेष म्हणजे दोनदा असा प्रकार घडला, मात्र खेळाडू एकच…

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात वॉर्नर आणि लाबुशेन फलंदाजी करत होता. डावाच्या 41 व्या षटकात फिरकी गोलंदाज इफ्तिकारने टाकलेला चेंडू वॉर्नरने स्क्वेअर लेगला टोलावला. मैदानावरील क्षेत्ररक्षकांनी त्या बाजूला उभ्या असणाऱ्या शाहिन आफ्रिदीला चेंडू ‘तुझ्याकडे येतोय’ असा इशाराही केला, मात्र चेंडू एका बाजूला आणि शाहिन एका बाजूला… नुसता राडा.

असाच प्रकार डावाच्या 57 व्या षटकातही दिसून आला. यासिरच्या गोलंदाजीवर वॉर्नरने चेंडू मिड विकेटला टोलावला. यावेळी 30 यार्ड सर्कलमध्ये असणारा शाहिन आफ्रिदी चेंडूमागे धावू लागला. सीमारेषेपूर्वी तो चेंडूपर्यंत पोहोचला देखील, मात्र चेंडू उचलताना धसमूसळेपणा केला आणि त्याच्या पायाला लागून तो सीमारेषेपार गेला. शाहिनची ही आंधळी कोशिंबरी पाहून मैदानावरील प्रेक्षकांनी त्याची खिल्ली उडवली.

आपली प्रतिक्रिया द्या