पाकिस्तान आला वठणीवर, हिंदुस्थानकडून ‘या’ वस्तूची आयात करण्याचा घेतला निर्णय

2129

जम्मू-कश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 हिंदुस्थानच्या सरकारने याच वर्षी हटवले. हिंदुस्थानच्या या निर्णयानंतर पाकिस्ताने आकांडतांडव केला आणि दोन्ही देशातील व्यापारही स्थगित केला. त्यामुळे पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब उसळला. परंतु आता पाकिस्तान वठणीवर आला असून इम्रान खान सरकारने हिंदुस्थानमधून पोलियो मार्कर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर देशांच्या तुलनेमध्ये पोलियो मार्कर आणि औषधे हिंदुस्थानकडून स्वस्तात मिळतात म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच इम्रान सरकारच्या मंत्रिमंडळाने पाकिस्तानमधील कंपन्या आणि आरोग्य विभागाला फक्त एकदाच मोठ्या प्रमाणात आयात करण्याची परवानगी दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेद्वारे (डब्ल्यूएचओ) निर्धारित केलेल्या मानकांनुसार मुलांना पोलियो डोस दिल्यानंतर मार्करचा वापर केला जातो. हिंदुस्थान आणि चीनमध्ये फक्त दोन डब्ल्यूएचओ मानकानुसार मार्करचे उत्पादन घेणारे निर्माते आहेत. या कारखान्यांमध्ये उच्च प्रतिचे विषविरहीत मार्कर तयार करण्यात येतात. कारण लहान मुलांना बोट चोखण्याची सवय असते आणि मार्करमुळे त्यांच्या पोटात अपायकारक घटक जाण्याची शक्यता असते. त्यामुळेच पाकिस्तानने हिंदुस्थानकडून हे मार्कर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

polio-markers

आपली प्रतिक्रिया द्या