पाकिस्तानात हिंदू कुटुंबाची गळा चिरून निर्घृण हत्या

murder-knife

पाकिस्तानामध्ये हिंदूविरोधातील कारवाया वाढत असल्याचं चित्र आहे. एका हिंदू कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या केल्याचं वृत्त आहे.

झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना पाकिस्तानच्या मुलतान जिल्ह्यातील रहीम यार खान शहरात घडली आहे. येथील अबुधाबी कॉलनीत हे कुटुंब राहत होतं. रामचंद मेघवाल असं या कुटुंबप्रमुखाचं नाव असून त्यांचा कपडे शिवण्याचा व्यवसाय आहे.

शनिवारी सकाळी रामचंद, त्यांची पत्नी आणि तीन मुलं त्यांच्या घरात मृतावस्थेत सापडले. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने चिरल्याच्या जखमा आहेत.

पोलिसांनी या घरातून रक्ताने माखलेली कुऱ्हाड आणि एक चाकू जप्त केला आहे. याच हत्यारांनी त्यांचा खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रामचंद मेघवाल एक कुटुंबवत्सल व्यक्ती होते. ते कुणाच्याही अध्यात मध्यात पडत नसत. अनेक वर्षं ते त्यांच्या परिसरातच कपडे शिवण्याचं दुकान चालवत होते. मात्र, अशा व्यक्तिचा खून झाल्याने परिसरातील हिंदू आणि शिखांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या