पाकिस्तानी हिंदू तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला, हत्येचा संशय

937
file photo

पाकिस्तानी हिंदू तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडल्याने खळबळ माजली आहे. नम्रता चांदनी नावाची ही तरुणी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातल्या घोटकी येथील रहिवासी आहे. घोटकी येथेच ईश निंदा केल्याप्रकरणी हिंदू मंदिरात जाळपोळ करण्यात आली होती.

एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, नम्रता ही मेडिकलची विद्यार्थिनी आहे. नम्रता ज्या हॉस्टेलमध्ये राहत होती, तिथल्या खोलीत तिचा मृतदेह सापडला आहे. होस्टेलच्या तिच्या खोलीत एका खाटेवर तिचा मृतदेह पडला होता. तिच्या गळ्याभोवती कपडा गुंडाळला होता आणि खोली आतून बंद होती. पोलिसांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. मात्र, ही हत्याच असून पोलीस खऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी आत्महत्येचा कांगावा करत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

नम्रताचा भाऊ विशाल याच्या म्हणण्यानुसार, तिची हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ही आत्महत्या नाही, कारण आत्महत्येमुळे पडणारे गळ्यावरचे व्रण वेगळे असतात. तिच्या गळ्याभोवती कापड आहे, पण तिच्या गळ्यावर केबलन आवळल्याच्या खुणा आहेत. तिच्या हातांवरही खुणा आहेत. दोन दिवसांपूर्वी विशालचं नम्रताशी बोलणंही झालं होतं. तेव्हा तिला कोणताही त्रास असल्याचं जाणवलं नाही, उलट ती खूप हुशार विद्यार्थिनी होती, असा दावा विशालने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या