पाकिस्तानात महागाईचा भूकंप, डाळ 260 तर टोमॅटो 400 रुपये किलो

1158

पाकिस्तानची आर्थिक कंगाली ही आता जगासाठी काही नवीन राहिलेली नाही. एकिकडे पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट होत असताना महागाईने देखील तेथील जनतेच्या नाकीनाऊ आणले आहेत. पाकिस्तानात सध्या दैनंदिन अन्नपदार्थांचे दर गगनाला भिडले आहेत.

पाकिस्तानात सध्या मूग डाळ ही 220 ते 260 रुपये, कडधान्य 160 रुपये प्रती किलो, साखर 75 रुपये प्रती किलो पर्यंत पोहोचले आहेत. तर टोमॅटोचे दर 425 रुपये प्रती किलोपर्यंत पोहोचले आहेत. पाकिस्तानचा महागाईचा दर 12.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या नऊ वर्षातील हा सर्वाधिक दर आहे.

जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानसोबतचे सर्व सामान खरेदीवर रोख लावली आहे. हिंदुस्थानातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो पाकिस्तान आयात करायचा. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून पाकिस्तानात टोमॅटोची टंचाई भासत असून त्यामुळे दर 400 रुपये प्रती किलो पर्यंत पोहोचले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या