पाकडय़ांचा नवा डाव, कुलभूषण जाधव यांचा पुनर्विचार याचिकेस नकार

517

कथित हेरगिरीप्रकरणी पाकिस्तानात तुरूंगात असलेले हिंदुस्थानचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबत पाकडय़ांनी नवीन बनाव रचला आहे. फाशीच्या शिक्षेविरोधात पुर्नविचार याचिका दाखल करण्यास कुलभूषण जाधव यांनी नकार दिल्याचा दावा पाकिस्तान सरकारने केला आहे. पाकडय़ांच्या कुटील बनावामुळे खळबळ माजली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. 17 जुन रोजी कुलभूषण जाधव यांना पुर्नविचार याचिका दाखल करण्यासाठी बोलाविण्यात आले होते. मात्र, त्यांनी याचिका दाखल करण्यास नकार दिला. त्याऐवजी सध्या दाखल करण्यात आलेली दयायाचिका यापुढे चालविण्यात यावी असे जाधव यांनी म्हटल्याचा दावा पाकने केला आहे. हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गेल्यावर्षी महत्त्वपूर्ण निर्णय देताना जाधव यांच्या फाशीला स्थिगिती दिली

आपली प्रतिक्रिया द्या