
गरिबीने त्रस्त झालेल्या पाकिस्तानच्या पंजाब सुबेच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या मेकअपसाठी सरकारने चार कोटी रुपयांचा फंड जारी केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये एकच गदारोळ उडाला आहे. हा फंड सरकारने त्यांच्या मेकअपसाठी जारी केला आहे. पाकिस्तान सरकारने मरियम नवाज यांच्या सोबत सूचना मंत्री आझम जाहीर बुखारी यांच्या मेकअपसाठी आणि प्रेझेंटेशनसाठीही फंड जारी केला आहे. याआधी मरियम नवाज यांच्या गाडीचे टायर बदलण्यासाठी एक कोटी पाकिस्तानी रुपये खर्च करण्यात आले होते. हे बजेट जारी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये जोरदार गदारोळ उडाला आहे.
पाकिस्तानमध्ये 1 लिटर दुधाची किंमत 200 रुपयांपासून 370 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचली आहे, तर एक लिटर पेट्रोलची किंमत अडीचशे रुपये आहे. 400 ते 500 रुपये डझन केळी विकली जात आहेत. 500 रुपये किलो सफरचंद विकले जात असताना मुख्यमंत्र्यांच्या मेकअपसाठी चार कोटी रुपये हवेत कशाला, असा सवाल विचारला जात आहे. गेल्या महिन्यात 12 जानेवारीला लाहोरमध्ये पंजाब सरकारचे कॅबिनेट सचिवाने 4 कोटी रुपयांचा एक स्पेशल आदेश मंजूर केला आहे. यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.




























































