पाकिस्तान कोरोना पॉझिटिव्ह दहशतवादी कश्मीरमध्ये पाठवण्याच्या तयारीत, पोलिसांची धक्कादायक माहिती

1510

पाकिस्तान कश्मीरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह दहशतवादी पाठवण्याच्या तयारीत आहेत. अशी धक्कादायक माहिती जम्मू कश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिली आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या कँपमध्येही कोरोनाचा फैलाव झाला आहे असेही त्यांनी सांगितले.


दिलबाग सिंह म्हणाले की पाकिस्तान कोरोना पॉझिटिव्ह दहशतावादी कश्मीर खोर्या त पाठवत आहे याचे सबळ पुरावे सुरक्षा दलाला मिळाले आहेत. एका दहशतवद्याने आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्याचा फोन टॅप केल्यानंतर ही धक्कादायक बातमी समजली. पाकिस्तानच्या दहशतवादी कँपमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. असे असले तरी पाकिस्तान सैन्य त्यांची कुठलीच मदत करत नाही. त्यांना औषधं पुरवण्याऐवजी शस्त्रसाठांचाच पुरवठा केला जात आहे. अशा दहशतवाद्यांनाच सीमापार कश्मीरमध्ये पाठवण्याची तयारी पाकिस्तान करत आहे.

मार्च महिन्याच्या सुरूवातीस सुरक्षा दलाने वीस दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. परंतु एकाही दहशतवाद्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे दिलबाग सिंह यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या