3 मार्च… क्रिकेटच्या इतिहासातील काळा दिवस, वाचा काय घडलं होतं या दिवशी

3 मार्च 2009 क्रिकेटच्या इतिहासातील काळा दिवस मानला जातो. याच दिवशी पाकिस्तानातील लाहोर शहरात श्रीलंकेच्या संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात श्रीलंकेचा कर्णधार महेला जयवर्धने, कुमार संगकारा, अजंथा मेंडिस, थिलन समरवीरा, थरंगा पारनविताना आणि चामुंडा वास जखमी झाले होते. या व्यतिरिक्त सहा जवान व 8 सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर अनेक वर्ष पाकिस्तानात एकही आतंरराष्ट्रीय सामना खेळवला गेला नव्हता.

driver-khaleel

फेब्रुवारी 2009 मध्ये श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान पहिला कसोटी सामना कराची येथे झाला. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 1 मार्च ते 5 मार्च दरम्याने लाहोरमधील गदाफी स्टेडीयमवर झाला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्च 2009 ला श्रीलंकेचा संघ हॉटेलवरून स्टेडियमला जायला निघत असताना त्यांच्या बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. बसचे ड्रायव्हर खलील याने प्रसंगावधान दाखवत खेळाडूंचे प्राण वाचवले होते.

बस ड्रायव्हर खलील यांनी बसवर गोळीबार होत असताना देखील बस भरधाव सुरूच ठेवली. ते भरधाव बस चालवत होते त्यामुळे अवघ्या 20 मिनिटांत बस गदाफी स्टेडीयमला पोहोचवली. खलील यांचा श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी देखील सत्कार केला होता. या हल्ल्यानंतर स्टेडीयम वरूनच श्रीलंकेच्या खेळाडूंना एअरलिफ्ट करून एअरपोर्टवर नेले होते व त्यानंतर तेथून ते तत्काळ श्रीलंकेला रवाना झाले. श्रीलंकेच्या खेळाडूंवरील हल्ल्यामुळे पाकिस्तानची जगभरात नालस्ती झाली. त्यानंतर 2019 पर्यंत एकही संघ पाकिस्तान दौऱ्यावर जायला तयार नव्हता.

आपली प्रतिक्रिया द्या