पाकिस्तानची हिंदुस्थानला पोकळ धमकी, 5 राफेल आणा नाहीतर 500, आम्ही तयार आहोत

1968

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कुरापती पाकिस्तानने पोकळ धमकी दिली आहे. हिंदुस्थानने 5 राफेल आणले काय किंवा 500 आणले काय, आम्ही तयार आहोत, अशी धमकी पाकिस्तानच्या सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी दिली. हिंदुस्थानच्या वायुदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांचा समावेश झाल्यापासून पाकिस्तानची झोप उडाली आहे. त्यामुळे आपली भीती लपवण्यासाठी ते असली विधाने करून भुकेने कंगाल झालेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत.

हिंदुस्थानने फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली आहे, मात्र आम्ही हिंदुस्थानी सैन्याच्या कोणत्याही आक्रमक कारवाईला उत्तर देण्यास पूर्णपणे तयार आहोत, असे मनाचे श्लोकही जनरल बाबर यांनी म्हटले. तसेच हिंदुस्थानच्या S-400 या मिसाईल डिफेन्स सिस्टीमचा सामना करण्यासाठी पाकिस्तान तयार असल्याचे जनरल बाबर म्हणाले.

हिंदुस्थानचा सैन्यावरील खर्च जास्त असून हत्यारांच्या रेसमध्ये सहभागी आहे. हिंदुस्थानने फ्रान्सकडून घेतलेल्या राफेलची हवा निर्माण केली, यामुळे त्यांची असुरक्षितता चव्हाट्यावर आली, असे अकलेले तारे जनरल बाबर यांनी तोडले. हिंदुस्थानने 5 राफेल आणले काय आणि 500 आणले काय आम्ही तयार असून आम्हाला आमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. मात्र हिंदुस्थानचे संरक्षण बजेट जास्त आहे, तसेच हिंदुस्थानने जास्तच हत्यारांची जमवाजमव सुरू केल्यास आंतरराष्ट्रीय समूह यावर प्रतिबंध घालेल, असा दावा जनरल बाबर यांनी केला.

कश्मीर राग आळवला
जनरल बाबर यांनी पुन्हा कश्मीर राग आळवला. हिंदुस्थान योजनाबद्ध प्रकारे जम्मू-कश्मीर मधील लोकसंख्या बदलू पाहात आहे. कश्मीरच्या नागरिकांवर गोळीबार करणाऱ्या पाकड्यानी हिंदुस्थानवरच शस्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.

आपली प्रतिक्रिया द्या