
गुरुवारी पहाटे पाकिस्तान कडून झालेल्या परतवून लावत हिंदुस्थानने लाहोर येथे ड्रोन हल्ले केले. हिंदुस्थानने ड्रोन हल्ले करत लाहोर मधील एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केली आणि त्यामुळे पाकिस्तानचे नाक कापले गेले आहे, यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या सीमा भागातील राज्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. आंतरराष्ट्रीय सीमांवर पाकिस्तान कडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू असून आकाशातून देखील सुसाईड ड्रोन हल्ले केले. मात्र हिंदुस्थानच्या लष्करानं पाकिस्तानच्या या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत सारे हल्ले परतावून लावलेत.
दक्षता म्हणून जम्मू कश्मीर मधील अनेक भागांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. त्यासोबतच राजस्थानच्या बिकानेर मध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आला आहे. पंजाब मध्ये जालंदर शहरात ब्लॅकआऊट करण्यात आला असून लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत.