पाकड्यांकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; कठुआमध्ये गोळीबार

408

जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानने शनिवारी पुन्हा एकदा शस्रसंधीचे उल्लंघन केल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानी सैन्याने शनिवारी जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील हिंदुस्थानच्या लष्करी चौक्यांना लक्ष्य केले. या चौक्यांवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला हिंदुस्थानी लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. कठुआतील हिरानगर सेक्टरमध्ये चकरा गावात शनिवारी सकाळी 4.00 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने गोळीबाराला सुरुवात केली. सुमारे अडीच तास पाकिस्तानकडून गोळीबार सुरू होता. या गोळीबारात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तानकडून मोर्टार्सही डागण्यात आल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुँछ जिल्ह्यातील शाहपूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ एका स्थानिक ग्रामीण रहिवाशाचा पाकिस्तानच्या गोळीबारात गुरुवारी मृत्यू झाला. तर इतर चार जण जखमी झाले होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा पाकिस्तानकडून शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या