टॉमॅटोला हात लावला तर मारून टाकीन, पाकिस्तानी नववधूची पत्रकाराला धमकी

2726

पाकिस्तानमध्ये महागाईचा चांगलाच आगडोंब उसळला आहे. टॉमॅटोने चांगलाच ‘भाव’ खाल्ला असून प्रति किलोचा दर 300 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे पाकिस्तानात टॉमॅटोला सोन्याचा भाव मिळात आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

टॉमॅटोचे भाव गगनाला भिडल्याने एका नववधुने टोमॅटोचेच दागिने आपल्या लग्नात परिधान केले आहेत. ही बाब एका पत्रकाराला कळताच त्याने लग्न मंडपात धाव घेतली.

पाकिस्तानी नववधूने सोन्याच्या दागिन्यांऐवजी टॉमॅटोचे दागिने घातले होते. पत्रकाराशी संवाद साधतना नववधू म्हणाली की सोन्याच्या किंमती खूप वाढल्या आहेत. टॉमॅटोचेही भाव वधारले आहेत. म्हणून मी माझ्या लग्नात सोन्याचे दागिन्यांऐवजी टॉमॅटोचे दागिने घतले आहेत.

पत्रकाराने सहज त्या टॉमॅटोला हात लावला तर नववधू चिडली आणि पत्रकारला म्हणाली माझ्या टॉमॅटोला हात लावलास तर मारीन. इतकेच नव्हे तर वधुच्या पालकांनी नवर्‍या मुलाला हुंड्यात तीन पेट्या टॉमॅटो दिल्या आहेत. या मुलाखातीचा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाकिस्तानमध्ये टॉमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. एक किलो टॉमॅटोची किंमत तब्बल 300 रुपये किलो आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या