Operation Sindoor – पाकिस्तानच्या गोळीबारात हरयाणाचा जवान शहीद

हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानकडून सकाळपासूनच सतत गोळीबार सुरू झाला. आज सकाळी जम्मूतील पूँछ येथे झालेल्या गोळीबारात हरयाणाचा एक जवान शहीद झाला. लान्स नायक दिनेश कुमार शर्मा (32) असे त्यांचे नाव असून ते पूँछ येथे तैनात होते. त्यांना दोन मुले असून पत्नी गरोदर आहे.